जळगाव राजमुद्रा दर्पण । शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री भाजप आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यासह दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आमदार गिरीश महाजन, भाजप महानगराध्यक्ष जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे सर्व आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते ५-६ हजार लोकांचा जमाव जमला होता. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेश लागू असतांना, तो झुगारून मोर्चाचे आयेाजन करण्यात आले होते.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून भाजप आमदार गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदुलाल पटेल, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदीलकर करत आहेत.