धुळे राजमुद्रा दर्पण । शिरपूर तालुका हद्दीवरील महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर बिजासन घाटात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे चालणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. सदर अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे.
बिजासन घाटातच गेल्या काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर सदर ठिकाणापासून काही अंतरावर अपघात झाला होता. या अपघातात कळवण तालुक्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा अपघात झाला.
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या मुंबई– आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात सेंधवा येथून धान्याचे पीठ घेऊन मुंबई येथे जात असलेल्या ट्रक (क्र. MH18, BA 9991) हा बिजासन पोलीस चौकीच्या काही अंतरावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यात पुढे चालणाऱ्या ट्रकच्या मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघात झाल्यानंतर नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी मदत कार्य करून जखमींना महामार्ग अम्ब्युलन्सच्या साहाय्याने सेंधवा रुग्णालयात दाखल करण्यात आले.