मुंबई राजमुद्रा दर्पण । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित 1 हजार कोटीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा दावा केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा साधलाय. सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे हजारो कोटीहून अधिकची संपत्ती आहे. 8 पेक्षा अधिक शहरात त्यांचं बेनामी साम्राज्य पसरलं असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.
अजित पवार लोकांना मूर्ख बनवणे थांबवा. तुमच्या कौटुंबिक मित्र कंपन्यांचे हजारो कोटीहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्या 8 पेक्षा अधिक शहरांमध्ये पसरलं आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग/मेन कंपनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्थापन केली होती. त्यासाठी 13 वर्षांपूर्वी 100 कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही? बनवा बनवी आणि फसवा फसवी थांबवा, असं ट्वीट सोमय्या यांनी केलंय.