मुंबई राजमुद्रा दर्पण । जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील क्रमचारी प्रतिक काळे या तरुणानं आत्महत्या केलीय. 30 ऑक्टोबर रोजी प्रतिक काळेनं आत्महत्या केलीय. महत्वाची बाब म्हणजे प्रतिक काळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात त्याने 10 जणांची नावं घेतली आहेत. त्या नावांमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचं आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचंही ही नाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.
प्रतिक काळे या तरुणाने 10 नावं घेतली. त्यातील 7 नावांवर एफआयआर दाखल केली. त्यातील 3 नावांवर मात्र पोलिसांनी आळीमिळी गुपचिळी साधली. जलसंधारण खातं सांभाळणाऱ्या शंकरराव गडाख यांच्यासारख्या नेत्याचं नाव घेऊन एक तरुण आत्महत्या करतोय. 30 तारखेला ही घटना घडलीय. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात अत्यंत अस्वस्थ वातावरण आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीची चर्चा तिथे सुरु आहे. हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, असा गंभीर आरोप उपाध्ये यांनी केलाय.
तसंच प्रतिक बाळासाहेब काळे याला न्याय मिळणार की नाही? हा आमचा पहिला प्रश्न आहे. ते सत्ताधारी पक्षाचे, शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून ते काहीही करु शकतात, अशी त्यांची भूमिका आहे का? त्यामुळे प्रतिक काळेला न्याय द्यायचा असेल तर मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण ते मंत्रिपदावर असल्यामुळे प्रतिक काळेनं नाव घेऊनही गडाख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे गडाख यांना पदावरुन दूर केल्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळणार नाही, अशी आक्रमक भूमिका केशव उपाध्ये यांनी मांडलीय.