मुंबई राजमुद्रा दर्पण । विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतीसाठी भाजपची रणनीतीवर चर्चा होणार असल्यचं सांगितलं जात आहे. ही बैठक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू होणार असून दुपारी 4.30 वाजेपर्यंत चालणार आहे.
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे 300 नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रितपणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधणार आहेत. एकूणच संमेलनाचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असे असणार आहे.
भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे हायकमांड या राज्यांमध्ये सातत्याने सभा घेत आहे. सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी भाजप सातत्याने कार्यकर्ता परिषदा घेत आहे. अशा स्थितीत 7 नोव्हेंबरला होणारी ही बैठक निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.