नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी भारतीय जवानांसोबत साजरी केली. मोदी यांनी आज नौशेरा सेक्टरमध्ये जाऊन जवानांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी सुमारे एक तास जवानांसोबत आपला वेळ घालवला.
त्यानंतर मोदींनी जवानांना स्वत:च्या हाताने मिठाई देखील चारली. गेल्या दोन वर्षापुर्वी मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर जवानांसोबत राजौरी येथे दिवाळी जवानांसोबत साजरी केली होती. मोदी यांनी ब्रिगेडच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जवानांसोबत चहापाणी केला, त्यानंतर ते आता दुपार त्यांच्यासोबत भोजन देखील करणार आहे. याच ठिकाणी मोदी जवानांना संबोधित करणार आहे. तसेच त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम देखील करणार आहे.
पंतप्रधान मोदी दरवर्षी दिवाळी सणाला जवानांची साजरी करतात. काही वर्षापुर्वी त्यांनी सांगितले होती की, बॉर्डरवर असणाऱ्या जवानांमुळेच आम्ही आज चांगल्या प्रकारे सण साजरे करू शकतो. त्यामुळेच मोदी दरवर्षी जवानांमध्ये जाऊन दिवाळी साजरा करत असतात.