धुळे राजमुद्रा दर्पण। दिवाळी सणाच्या काळात धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढल्याचे दिसून येत आहे. धुळे शहरातील अनमोलनगर येथील एकाच परिसरात दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. दिवाळी सणानिमित्त दोन्ही घरातील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून दिनेश पाटील व पियुष नेमाने या कुटुंबीयांच्या घरावरती चोरट्यांनी हात साफ केला आहे.
परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित चोरी झालेल्या घरमालकांना फोन करून चोरी संदर्भातील माहिती दिली आहे. एका घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास पंचवीस ते तीस हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरे घर मालक अद्याप घरी पोहोचू शकले नसल्यामुळे त्या घरातील चोरीचा अंदाज लावणे शक्य नसल्यामुळे घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे..