जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा बँक निवडणुकीतील खडसेंचे प्रतिस्पर्धी असलेले मुक्ताईनगर येथील नाना पाटील यांची याचिका अखेर औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत नाना पाटील यांनी माजी मंत्री खडसे यांच्या विरोधात नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भुसावळ येथील जय माता दी पथसंस्थेचे कर्ज दार असल्याचे सांगून त्यांचे नाम निर्देश पत्र रद्द केले होते,
यावरून त्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत न्याय मागण्याची विनंती केली होती मात्र त्या ठिकाणी देखील त्यांचा उमेदवारी अर्जा सुनावणी वेळी अर्ज फेटाळून लावण्यात आला होता मात्र विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान देत त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती मात्र अखेर न्यायालयाने देखील त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळून लावला आहे.
21 दिवसाच्या माघारी काळात नाना पाटलांच्या कायदेशीर लढाई अखेर त्यांना अपयश आले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सध्या ते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे विरोधक असताना उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याने निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहे.
यामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. नाना पाटलांची याचिका फेटाळून लावल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे अखेर बिनविरोध निवडल्याचे स्पष्ट झाले आहे.