मुंबई राजमुद्रा दर्पण। नवाब मलिक यांनी आज सकाळी सकाळीच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. आर्यन खान प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मी मागणी केली होती. त्यानंतर एक नव्हे तर दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. एक राज्य सरकारने आणि दुसरी केंद्र सरकारने स्थापन केली आहे. आता कोण वानखेडेंचा आणि त्यांच्या खासगी आर्मीचा पर्दाफाश करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, मलिक यांनी पहिल्यांदाच वानखेडेंवर आर्यन खानच्या अपहरणाचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आर्यन खान प्रकरणासह एकूण सहा प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला आहे. दिल्लीहून आज सहा अधिकारी येणार असून प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे. दिल्लीतील एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंग हे सुद्धा आज मुंबईत येणार आहेत. संजय सिंग हे आर्यन खान प्रकरणाचा तपास करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, वानखेडे यांच्याकडून मलिक यांचे जावई समीर खान यांची केसही काढून घेतली नाही.