अहमदनगर राजमुद्रा दर्पण। जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आग लागली तेव्हा आयसीयूत जवळपास 20 जण होते. ही आग आटोक्यात आणेपर्यंत या विभागात उपचार घेत असलेले 10 रुग्ण दगावले आहेत. तसेच इतर काही रुग्ण भाजून जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांना आता पुण्यात हलवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात असलेला अतिदक्षता विभाग रुग्णालयाच्या अत्यंत मध्यभागी आहे. या विभागात जवळपास वीस रुग्णांवर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी या विभागात आग पसरल्याने एकच धावपळ उडाली. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रनेचा वापर करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही.
त्यामुळे अहमदनगर महापालिका तसेच एमआयडीसी अग्निशमन विभागाची वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या वाहनांनी यावेळी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच रुग्णालयाचे व्यवस्थापन अतिदक्षता विभागापर्यंत पोहोचले. आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.