धुळे राजमुद्रा दर्पण। केंद्रीय मंत्री रामदास आठवले धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सोहळ्यादरम्यान आठवले यांनी ड्रग्ज घेणाऱ्यांना तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायला हवे, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला आणि दारू पिणाऱ्याला तुरुंगात आपण टाकत नाही, त्याप्रमाणेच ड्रग्ज घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे.
अशा पद्धतीने विधान करीत ड्रग्ज घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा खुलासा देखील रामदास आठवले यांनी केला आहे.आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी नशामुक्ती केंद्र उपयुक्त आहे. म्हणून सध्या जो कायदा आहे ज्यात ड्रग्ज घेतलेल्याला तुरुंगात टाकले जाते त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार आमचे मंत्रालय करत आहे. लवकरच त्यासंबंधीचा कायदा जर झाला तर ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात न पाठवता नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात येईल, असे आठवले म्हणाले.
.