मुंबई राजमुद्रा दर्पण। अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. तर दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.