बोरी नदीवरील मोंढाळे पिंप्री ता. पारोळा येथील बंधाऱ्यातील जलपुजन संपन्न
मोंढाळे पिंप्री ता. पारोळा राजमुद्रा दर्पण | बळीराजाच्या जीवनात समृध्दी आणावयाची असेल तर त्याला पुरेशी सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल. यामुळे निर्माण होणारी समृध्दी सुबत्ता परिसराचा कायापालट करणार आहे. म्हणूनच आज बोरी नदीवरील मोंढाळे पिंप्री ता. पारोळा येथील बंधाऱ्यातील जलपुजन हे या परिसरातील शेतकरी मायबाप जनतेसाठी भविष्यातील लक्ष्मीपूजन असेल अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली आहे.
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून साकारलेला
बोरी नदीवरील मोंढाळे पिंप्री ता. पारोळा येथील बंधाऱ्यातील जलपुजन संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मार्केट सभापती बाळासाहेब भास्करराव पाटील तर प्रमुख अतिथी पंचायत समितीच्या सदस्या सौ. सुजाताताई पाटील तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा पवार, माजी सभापती डॉ. सुभाष पाटील, मोंढाळे सरपंच बळवंतराव पाटील, पिंप्रीचे सरपंच जोस्त्ना पगारे, बोळे सरपंच रावसाहेब गिरासे, डॉ. मनीष पाटील,
मोंढाळे ग्रा पं सदस्य प्रताप पाटील, मा.सरपंच लक्ष्मण पाटील, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, पिंपरी माजी सरपंच गंभीर आबा पाटील, संकेत पाटील, छोटू पाटील, राजू पाटील.मल्हार कुंभार, किरण पाटील, विवेक पाटील, दीपक भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला विधिवत जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला.प्रास्तविक सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी केले. गावकऱ्यांच्या वतीने खासदार उन्मेश दादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. खासदार उन्मेशदादा पाटील पुढे म्हणाले की जल है तो जीवन है, जल है तो कल है या उक्तीनुसार पाणी येईल ती आर्थिक समृध्दी घेऊन आणि आर्थिक उन्नती ही परिसराच्या विकासासाठी मोठी मोलाची कामगिरी बजावेल असे ते म्हणाले.यावेळी केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ई श्रमिक कार्डचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. सुभाष पाटील यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले.नगराध्यक्ष करणदादा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की वर्षानुवर्षे तालुक्यातील समस्या जैसे थे तशाच आहेत. स्वर्गिय माजी आमदार भास्करराव आप्पा पाटील यांच्या जलसिंचनाच्या दृष्टीला पुढे नेण्यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या माध्यमातुन आज हा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधाऱ्यांच्या निर्मितीने हा परीसर अधिक सुजलाम सुफलाम होईल. गावाच्या चौफेर विकासाला चालना मिळणार आहे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन व आभार नगरसेवक पि.जी.पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महीला, गावकरी उपस्थीत होते.