मुंबई राजमुद्रा दर्पण । बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेत कोट्यवधींचे बेकायदेशीर रुपये सापडले आहेत. हे पैसे नक्की कुणाचे आहेत? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच हे पैसे नक्की कुणाचे आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण दिल्ली वारी देखील करणार असल्याचे सोमय्या यांनी माध्यमं सांगितले आहे.
सप्टेंबर महिन्यात बुलढाणा येथील बुलढाणा सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या. कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार, काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग आयकर विभागाला सापडले होते. यामध्ये अनेक बेकायदेशीर खाते आढळून आले त्यातील कोट्यवधींची माया जमवण्यात आल्याचा संशय तपास यन्ग्तर्णेला होता. आता पर्यंत 1200 हून अधिक खाती बेनामी असल्याचे सिद्ध होत आहे, या खात्यांद्वारा 53.72 कोटी मनी लॉंडरींग करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आयकर विभागाने हे 53.72 कोटी रुपये असलेली 1200 बँक खाती स्थगित केले आहेत आणि पैसे जप्त केले आहे. असे सोमय्या यांनी दिलेल्या माहिती मध्ये समोर आले आहे.
महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे पैसे ?
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी हे पैसे ठाकरे सरकारच्या एका मंत्र्याचे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील हा नेता असल्यचे सोमय्या यांनी दिलेले संकेत यावरून स्पष्ट होते, बुलढाणा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांना या व्यवहारांची पूर्ण जाणीव आहे. बुलढाणा नागरी पतसंस्था द्वारा कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार होत आहेत, याची माहिती गेले अनेक महिने कानी आली होती. ठाकरे सरकारचे राजकीय नेते मंत्री आणि या पतसंस्था/ बँकेचे अध्यक्ष द्वारे अश्या प्रकाराचे शेकडो बेनामी बँक खाते उघडणे, त्यात रोख रक्कम जमा करणे, व त्या समोर कोट्यवधींचे रुपयांचे कर्ज देण्याचे व्यवहार ही पुढे येत असल्याची खळबळ जनक माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
या पतसंस्थेच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लाँडरींग झाले आहे असे समजते. उद्या या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्ली येथे जात आहेत.शुक्रवारी या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या बुलढाणा येथे सुद्धा भेट देणार आहेत. आणि त्यानंतर ते नांदेडलाही जाणार आहे. या पतसंस्थेकडून आघाडी सरकारच्या मंत्र्यांना 70 कोटींचं कर्ज देखील अपारदर्शक पध्दतीने देण्यात आल्याचेही कळते. दिल्लीत सहकार मंत्रालय, ED, आयकर विभाग अशा विभिन्न अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती घेणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. शुक्रवारी या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या बुलढाणा येथे सुद्धा भेट देणार आहेत. आणि त्यानंतर ते नांदेडलाही जाणार आहे. असल्याची ,माहिती देण्यात आली आहे.