मुंबई राजमुद्रा दर्पण | धुळे येथील सुनील पाटील यांना मी आयुष्यात कधी भेटलो नाही त्यांचे आणि माझे काही संबंध नाही असे सांगतानाच सुनील पाटील यांचे भाजप नेते केंद्रीय मंत्रीअमित शहा यांच्या बरोबर व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज माध्यमांसमोर केला आहे. मलिक यांनी अमित शहा यांच्या सोबत सुनील पाटील यांचे कनेक्शन जोडल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. मोठी राजकीय फोडणीया प्रकरणामुळे दिले गेल्याचे दिसून येते.यामुळे भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर नवाब मलिक यांनी टीका केल्याने खळबळ उडाली आहे क्रूज द्रक्स प्रकरणात थेट अमित शहा यांचे नाव जोडले गेल्याने महा विकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष राज्यात पेटताना दिसून येणार आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते मोहित कंबोज यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहेत तसेच सुनील पाटील प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी थेट अमित शहा ज्यांचे नाव घेतले आहे धुळे येथील सुनील पाटील यांना मी आयुष्यात कधी भेटलो नाही सुनील पाटलांचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही याउलट पाटील चे अनुष्ठान सोबत चे व्हिडिओ आहेत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे शपथविधी सोहळा चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सुनील पाटील चे मंत्री राणा सोबतचे कंबोज फोटो दाखवत होते असा दावा मलिक यांनी माध्यमांसमोर आज जाहीर पत्रकार परिषदेत केला.
काय म्हणाले नवाब मलिक ?
सहा तारखेला मी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा मला पत्रकार परिषदेच्या दोन तासानंतर सुनील पाटील चा फोन आला होता. साहेब मी धुळ्याहून बोलतोय मी तुम्हाला या पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती देऊ शकतो, असं सुनील पाटील म्हणाले होते. यावर मी त्यांना मुंबईत यायला सांगितलं दुसरा पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांचा फोन आला विजय पगारे जेव्हा माझ्याकडे आले. तेव्हा ही पाटील आले नाही पगारे सोबत भांगाळे नावाचा व्यक्ती होता त्याच्या फोनवर त्यांनी सुनील पाटील अशी चर्चा केली तुम्ही घाबरू नका मलिक साहेब.. तुम्हाला पोलिसांच्या हवाली करतील.. असे भंगाळे यांनी पाटील यांना सांगितलं. मला नंबर दिला तेव्हा मी डायल केला असता पाटील चाच नंबर होता. मी सांगितलं तुम्ही… पोलिसांना शरण या.. सत्य सांगा ..त्यावर ते म्हणाले की मी गुजरातला आहे मला थांबवला आहे. मी कोणत्याही परिस्थितीत येईल पण अजून ते आले नाहीत असे मलिक यांनी सुनील पाटील बाबत माहिती देताना सांगितले आहे.