मुंबई राजमुद्रा दर्पण | सध्या गाजत असलेले क्रूझ ड्रग्स प्रकरण प्रकरणात वेगवेगळे गौप्यस्फोट राजकीय नेते करीत आहे. यामुळे राजकीय वातावरण तंग झालेले आहे अनेक आरोप-प्रत्यारोप या प्रकरणात होत असल्याने अनेक जण चौकशीच्या रडारवर आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोपी स्पोर्ट केले आहे आर्यन खान अटक केल्यानंतर मी या प्रकरणाची पोलखोल करण्यास सुरुवात केली. यामुळे एनसीबी चे धाबे दणाणले त्यानंतर अभिनेता शाहरुख खान नाही घाबरवण्याचे प्रयत्न करण्यात आले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा.. तो तेरा बेटा लंबा जायेगा …आशा सुद्धा शब्दात धमक्या देऊन राबवण्यात आले आहे यामुळे शाहरुख खान वर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गौप्यस्फोट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
पडद्यामागे काय घडत आहे हे मला माहिती नाही, वानखेडे कोणाला फोन करत आहे. हे मी नंतर उघड करेल महिलांनाही धमकावले जात आहे, याची ही माहिती उघड करेल असे मंत्री मलिक यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणातील पीडितांनी कोणालाही घाबरू नये पूजा ददलानी चे प्रकरण यात आले आहे. तुम्ही पन्नास लाख रुपये दिल्याने तुम्हीही आरोपी व्हाल असे घाबरवले जात आहे. पीडितांनी घाबरून न जाता तुम्ही पीडित आहात त्यामुळे पूजा दलालनीने घाबरू नये असा आवाहन नवाब मलिक यांनी केल आहे. आतापर्यंत झालेल्या धाडीत ज्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. त्या सर्व लोकांनी पुढे यावे त्यांनी एन सीबीची पोलखोल करावी तुम्ही पीडित आहात त्यामुळे उघडपणे समोर जा. असे आवाहन देखील मलिक यांनी क्रुज ड्रग्स प्रकरणातील संबंधितांना आवाहन केले आहे.
मुंबईतील काँग्रेस नेते तसेच पालकमंत्री अस्लम शेख यांना पार्टी देण्यासाठी कशिफ खान हा फोर्स करीत होता. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नेत्यांना पार्टीत घेऊन जाणार होता. तो मंत्री अस्लम शेखला का घेऊन जाणार होता ? मंत्र्यांच्या मुलांचा का ट्रॅप करत होता कट रचून ड्रग्सचा खेळ सरकार चालवत आहे अशी बदनामी करण्याचा डाव होता. असा दावा करताना असलम शेख देखील प्रकरणाची माहिती देतील. आता या प्रकरणाची मुंबईच्या एसआयटीने ही चौकशी केली पाहिजे अशी मागणी यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे.