जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय रंग चढला असताना मात्र आजच्या शेवटचा माघारीचा दिवस असताना भाजप नेते आ. गिरीश महाजनांसह सर्वच उमेदवारांनी माघार घेत जिल्हा बँक निवडणुकीत पीछेहाट घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीला सहज जिल्हा बँकेत आपली सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. मात्र भाजपच्या सर्वच उमेदवारांनी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सर्व पक्षीय पॅनल मधून भाजप बाहेर पडल्यावर बँकेची निवडणूक स्वंतत्र लढण्याची घोषणा भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी केली होती. सर्वच जागांवर भाजपच्यावतीने उमेदवार देण्यात आले होते मात्र आमदार खासदार यांच्या सहा उमेदवारांचे काही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले होते. यावरून भाजपने कायदेशीर लढाई देखील केली मात्र त्यात भाजपला अपयश आले. गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली असताना अचानक पणे निवडणुकीवर भाजपकडून बहिष्कार टाकण्यात आला आल्याने महाविकास आघाडीचे नेते देखील चक्रावले आहे.