जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्हा बँकेत अनेक बेकायदेशीर व्यवहार झाले असून त्याचा पाठपुरावा आधी केला होता मात्र आणखी काही पुरावे जमा करून बँकेत झालेल्या बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश करू व त्याचा पाठपुरावा करू असा इशारा आज भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी जिल्हा बँकेतील विरोधकांना दिला आहे. जिल्हा बँक निवडणुकी मध्ये आश्चर्य कारक भाजपने माघारी घेतल्या नंतर महाजन यांनी हे व्यक्तव्य केले आहे. मात्र जिल्हा बँकेत भाजपच्या माघारी नंतर सूचक विधान करून भविष्यात बँकेत झालेंल्या गैरव्यवहारामुळे चौकशीचा ससेमिरा लागण्याचे संकेत भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी दिले आहे.
जिल्हा बँकेत काही संचालकांनी बेकायदेशीररित्या कर्ज देऊन व्यक्तीगत लाभ करून घेतला आहे त्यामुळे बँकेत अनेक असे गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे यापूर्वी देखील या सर्व गैरव्यवहाराचा पाठपुरावा करण्यात आला असून यापुढे देखील बँकेत झालेल्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विविध तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल असे देखील भाजप नेते महाजन माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सर्वपक्षीय पॅनल मधून ऐनवेळेस आमच्यासोबत दगाबाजी करण्यात आली. आम्हाला गाफील ठेवण्यात आले. यामुळे जिल्हा बँकेत पाहिजे तेवढी तयारी आम्हाला करता आलेली नाही. काही उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक रद्द करण्यात आले. सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता काबीज करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला आहे. आगामी काळात जिल्हा बँकेत झालेला गैरव्यवहार समोर आणल्या शिवाय राहणार असा दावा देखील महाजन यांनी केला आहे.