जळगाव राजमृद्रा दर्पण । जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महापौर जयश्री महाजन यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध जाहीर झाली आहे.
महापौर जयश्री महाजन यांचे प्रतिस्पर्धी आमदार राजुमामा भोळे आणि योगेश नारायण पाटील यांनी माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकून सर्व उमेदवार मागे घेतल्याने आता महाविकास आघाडीकडून निवडले जाणारे संचालक मंडळ सत्तेवर येणार आहे.