जळगाव राजमृद्रा दर्पण । जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत आता चोपडा सोसायटी मतदारसंघातून तिरंगी लढत अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले असले तरी या मतदारसंघातून भाजप उमेदवाराने माघार घेतलेली नाही त्यामुळे भाजपच्या २३ उमेदवारांची माघार आतापर्यंत झालेली आहे. चोपडा सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार संगीता प्रदीप पाटील यांची उमेदवारी कायम असल्याने ही लढत तिरंगी होणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आणि राष्ट्रवादीकडून अरूण गुजराथी यांचे समर्थक घनश्याम अग्रवाल हे दोन तुल्यबळ उमेदवार आहे. संगीता पाटील यांची आता मतदानाच्या तारखेपर्यंत काय भूमिका समोर येते त्यावर राजकीय जाणकारांचे लक्ष राहणार आहे.