(सिंधुदुर्ग राजमुद्रा वृत्तसेवा)
तोक्ते वादळाच्या परिणामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्यस्थीतीला चिपी विमानतळावर दाखल झाले असून मालवण येथील वायरी गावाला भेट देणार आहेत; तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देवगड मध्ये पाहणी करत असल्याचे सांगण्यात आले.
आजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री हे सध्या कोकण दौऱ्यावर असताना मोठ्या प्रमाणावर राज्यात चर्चा चालू आहेत. या एक दिवसीय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये संबंधित गावांची पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. निसर्ग वादळानंतर दुसऱ्याच वर्षी तोक्ते या वादळाने दिलेल्या फटक्यामुळे महाराष्ट्रात किनारपट्टी भागांवर फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसान अंतर भाजप-शिवसेना यांच्यात जोरदार राजकारण रंगत आल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज चक्क आजी आणि माजी मुख्यमंत्री यांची पाहणी असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
भाजप कडून शिवसेनेची टीका करत असताना “कोकणवासीयांच्या पदरात नेमकं काय पडणार” असा सवाल केला जात होता. यावर प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “आम्ही जास्त फिरत बसण्यापेक्षा महत्त्वाचं तेच करतो, आम्ही कोकणात फक्त फोटोसेशन साठी आलो नाही” असा टोला विरोधकांना दौऱ्यापूर्वीच लगावला आहे. आता नेमकं चक्रीवादळा नंतर राजकीय वादळ कितपत मोठे रूप धारण करणार हे संबंध महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय ठरणार आहे.