जळगाव राजमुद्रा दर्पण | अजिंठा गेस्ट हाऊस संदर्भात झालेल्या सोशल मीडियावर वायरल पोस्ट ची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्याकडे केली आहे. लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येत असतात चार ते पाच लाख जनता यांच्या पाठिंब्याने आम्ही विकास मंदिर म्हणून बनवल्या जाणाऱ्या सभागृहात जातो. चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर माहिती पसरवून पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे जो कोणी मास्टरमाइंड आहे. अथवा दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
लोकप्रतिनिधींची नाहक बदनामी या प्रकरणांमधून करण्यात येत आहे प्रकरणात लक्ष नसताना चुकीच्या पद्धतीने पोस्ट बनवून व्हायरल करण्यात येत आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकप्रतिनिधी यांना आदर्श म्हणून पाहिले जाते पोलीस अधीक्षकांना व्हायरल पोष्ट संदर्भात निवेदन दिले असून कोणी दोषी असेल तर कार्यवाही व्हावी लोकप्रतिनिधींना जीवनातून उठवण्याचा हा डाव असल्याचे सांगितले जात आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने पोष्ट व्हायरल करणाऱ्यांवर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी आम्ही आज केल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर अजिंठा गेस्ट हाऊस येथे अनैसर्गिक कृत्य झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती यामध्ये काही लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी देखील अद्याप पर्यत अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. अथवा अधिकृत रित्या कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती देण्यात आली आहे. अशा अफवांमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव बदनाम होत असल्याची भावना भाजपच्या लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षकांसह पोलीस महानिरीक्षक यांना ई-मेल द्वारे तक्रार पाठवण्यात आली असल्याची माहिती मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.