जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर जळगाव जिल्ह्याचे बदनामीकारक असे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहे अजिंठा गेस्ट हाऊस येथे एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. ज्या वेळेत हा प्रकार घडला त्यावेळी रेष्ट हाऊस मध्ये रूम कोणाच्या नावे बुक होता तसेच सदर वेळेत कर्मचारी यांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील,महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांना राष्ट्रवादीच्या वतीने कारवाईची मागणी करून निवेदन देण्यात आले आहे.
अजिंठा विश्रामगृह प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पालकमंत्री जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणांमध्ये एका राजकीय पक्षाचा उच्चपदस्थ पदाधिकारी असल्याचा दावा राष्ट्रवादी ने दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. हे प्रकरण दडपले जाऊ शकते असा देखील संशय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची वेळीच चौकशी होऊन दोषींचा पाठलाग करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या घाणेरड्या कृत्यामुळे लोकप्रतिनिधींची बदनामी होत असल्याने जिल्ह्यातील सर्व आमदार व लोकप्रतिनिधी यांना संशयाच्या नजरेने बघितले जात असल्याची भावना आमदार मंगेश चव्हाण निर्णय व्यक्त केल आहे. हे प्रकरणात जर सत्यता असेल तर दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा या प्रकरणाचा ‘मास्टर माईंड’ ज्याने कोणी या सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी लोकप्रतिनिधींना जीवनातून उठवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.