मुंबई राजमुद्रा दर्पण । मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्या आरोपावरुन दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हे सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर टायगर मेमनच्या नेतृत्वात बॉम्ब कुठे ठेवायचे याची रेकी केली होती. तसंच मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरणारे हे होते. तसंच त्यांना या स्फोटाप्रकरणी संपूर्ण माहिती होती. दुसरे व्यक्ती सलीम पटेल. हा सलीम पटेल म्हणजे एका इफ्तार पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत फोटो आला. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. हा सलीम पटेल म्हणजे हसिना पारकरचा प्रमुख माणूस. त्याच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार व्हायच्या, अशी माहिती फडणवीसांनी दिलीय.
कुर्ल्यात एलबीएस रोडवर गोवावाल्याची जागा होती. सलीम पटेलने त्याची पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली. त्या जमीनीचा दुसरा एक भाग शाह वली खान यांच्या नावाने आहे. या दोघांनी जवळजवळ तीन एकरची जागा सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली. या कंपनीच्या वतीनं त्याच्यावर सही केली ती फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी मलिक यांच्या कुटुंबाकडे आहे. स्वत: मलिक काही काळ या कंपनीवर संचालक राहिले आहेत. महत्वाची बाब म्हणजे सॉलिडसला ही जागा केवळ 30 लाखात विकली गेलीय. मलिक या कंपनीत 2019 पर्यंत होते. मंत्रि झाल्यावर त्यांनी त्या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला. ही जमीन त्यांनी खरेदी केली तेव्हा रेट 2 हजार स्क्वेअर फुटने केली गेली. अंडरवर्ल्ड करुन खरेदी केलेली जमीन 30 लाखात खरेदी केली गेली. पेमेंट झालं 20 लाख. सलीम पटेलच्या अकाऊंटवर हे 15 लाख रुपये गेले. उर्वरित रक्कम शाह वली खानला मिळाले.
2003 मध्ये व्यवहार 2005 ला संपला तेव्हाम मलिक मंत्री होते. तेव्हा त्यांना माहिती नव्हतं का सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? आणि असं काय होतं की एवढी महागडी जमीन तुम्हाला 20 लाखात मिळाली? त्याला कारण या गुन्हेगारांवर टाडा लागला होता. टाडा कायद्यानुसार गुन्हेगारांची सगळी प्रॉपर्टी जप्त होते. त्यामुळेच यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून तर हा व्यवहार झाला नाही ना. यात सरळ अंडरवर्ल्डसोबत संबंध दिसून येतो, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.