(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
जळगाव जिल्हा होमगार्डसचे द्वितीय जिल्हा समादेशक व जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे सल्लागार तसेच अनेक सामाजिक व क्रिडा संस्था मध्ये सतत कार्यरत राहणारे वकील श्री.हेमंतजी मुदलियार यांचे आज दुखद निधन झाले आहे.
मुदलीयर हे अतिशय मनमिळाऊ व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दुःख व्यक्त केले जात आहे. ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे माजी संचालक होते.