जळगाव राजमृद्रा दर्पण । मुक्ताईनगर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुक्ताईनगर नगराध्यक्षा यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी 8 नोव्हेंबर रोजी अपात्र घोषित केल्याचा आदेश दिला आहे.
येथील नागरिक गिरीश चौधरी यांनी नगराध्यक्षांच्या या निवडीला जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-१ ब अन्वये आव्हान दिले होते. निवडणुकीचे नाम निर्देशन पत्र भरतांना सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. नंतर शासनाने यात सुधारण करुन सहा महिन्याच्या मुदतीत बदल करून बारा महिन्यांची मुदत करण्यात आलेली होती. नगराध्यक्ष हे २०/७/२०१८ रोजी रोजी निवडून आलेल्या होत्या त्यांनी २०/७/२०१८ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अभिप्रेत होते. मात्र सदर प्रमाणपत्र १५/१०/२०१९ रोजी सादर केले गेले आहेत याचा अर्थ प्रमाणपत्र मुदतीत सादर केलेले नाही म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र नगर परिषदा परिसर नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 51-1 व अन्वये अपात्र घोषित करण्यात आले असल्याचा आदेश केला आहे. गिरीश चौधरी यांच्यातर्फे औरंगाबाद येथील नामांकित ॲड भाऊसाहेब देशमुख यांनी काम पाहिले. पुढील काळात नगरपंचायतीचा नागरीकरणाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आरोग्य व इतर विभागीय विभागातील भ्रष्ट कारभार उघडकीस आणणार असे गिरीश चौधरी म्हणाले.