जळगाव राजमुद्रा दर्पण । कालिंका माता मंदिर ते तरसोद फाट्यापर्यंत असलेला हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून त्यावर खड्डे जास्त प्रमाणात झालेले आहेत. त्यामुळे रोज होणाऱ्या अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे, हा रास्ता दुरुस्तीचे विनंती अर्ज देऊन देखील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही. आंदोलनाचा इशारा देऊन देखील याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी सरचिटणीस पंकज वासुदेव बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.