पंढरपूर राजमुद्रा दर्पण । पंढरपूरकडे जाणारे पालखी मार्ग हे भक्तीचे प्रतीक आहेत. या मार्गावरून जाणारे वारकरी भक्ती आणि शक्तीचा परिचय देतात, निर्मल वारीतून स्वच्छतेचा जागर करतात. सामाजिक सौहार्दाचे प्रतीक असलेल्या वारीत कोणाशीही भेदभाव होत नाही. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासाला देखील चालना मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. पंढरपूरला जोडणाऱ्या या महामार्गासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले.”मी सर्व वारकऱ्यांना नमन करतो, कोटी कोटी अभिवादन करतो,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांचं अभिनंदन केलं.
ही यात्रा जगातिल सर्व प्राचीन यात्रा आणि एक लोक चळवळ म्हणुन पाहिली जाते असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. दिंडीत कोणताही भेदभाव नसतो, सर्व वारकरी एकमेकांचे भाऊ बहीण असतात, सर्व विठ्ठलाची मुलं आहे असं म्हणत, यातूनच आपला सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हे ब्रीद निर्माण झालं असं मोदींनी यावेळी सांगितलं.