मुंबई राजमुद्रा दर्पण । अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसा पोहोचला? सहार विमानतळावर रियाज भाटीला दोन बनावट पासपोर्टनिशी पकडण्यात आलं होतं. त्याला जामीन कसा मिळाला? देवेंद्र फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी गुन्हेगारी जगताशी फडणवीसांचे कसे संबंध आहेत याची पोलखोल केली. रिजाय भाटी कोण आहे? हा सवाल तुम्हाला आहे. 29 ऑक्टोबर रोजी सहार विमानतळावर बनावट पासपोर्टसह पकडला गेला. त्याच्यावर दाऊद इब्राहिमशी त्याचे संबंध असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. रियाज भाटी कोण आहे हे सर्वांना माहीत होतं. डबल पासपोर्टसह एखादा व्यक्ती पकडला जातो आणि दोन दिवसात तो सुटतो त्यामागे काय खेळ होता? रियाज भाटी तुमच्या सोबत अनेक कार्यक्रमात कसा दिसला? रियाज भाटी भाजपच्या कार्यक्रमात का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलपर्यंत रियाज भाटी कसा जात होता? देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करत नाही. पण त्यांच्या कार्यक्रमात कोणी जात असेल तर स्कॅनिंग केल्याशिवाय कुणाला पास दिला जात नाही. पंतप्रधान मुंबईत आले. तेव्हा त्यांच्यासोबत रियाज भाटीने फोटो काढले. कोणत्याही स्क्रुनिटीशिवाय रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला? त्याचे कारण काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केली. रियाज भाटीला आशीर्वाद असल्याशिवाय तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जाऊच शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. रियाज भाटी फरार आहे. मुन्ना यादववर गुन्हे आहेत. या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा असं आवाहन आम्ही एजन्सीला करत आहोत. बनावट नोटांचं कनेक्शन पाकिस्तानशी आहे. त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.