मुंबई राजमुद्रा दर्पण । कोरोनाच्या परिस्तिथीचा आढावा घेत १२ नोव्हेंबर पासून राज्यातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या साठी वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक असणार आहे. यासाठी राज्यातील शाळेच्या तसेच दिवाळीच्या सुट्ट्याच्या पत्रकात फेर बदल करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण साठी केली जाणारी पूर्व तयारी, त्यादिवशी काय काम करायचे त्याची माहिती, आवश्यक अंमलबजावणी सूचना आणि वेळा पत्रक सर्व शाळांमध्ये पाठविण्यात आले आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक असण्याचा सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी केंद्रसरकार कडून मुंबईतील महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या १४० शाळा आणि बृहन्मुंबई शहर व उपनगराच्या अंतर्गत येणाऱ्या १५२ शाळांची निवड करण्यात आली आहे. या साठी शाळांमध्ये मुख्याध्यापक, विद्यार्थी , शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक आहे. या साठी पालिका आयुक्ताने मंजुरी दिलेली आहे.