मुंबई राजमुद्रा दर्पण । केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात घट केली असली तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच आहेत. त्यातच घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केलीय. 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान विविध आंदोलनं करणार असल्याचं पटोले यांनी जाहीर केलंय.
महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणाऱ्या धोरणांविरोधात महाराष्ट्र काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विविध आंदोलनं करणार असल्याची घोषणा पटोले यांनी केली आहे.