जळगाव राजमुद्रा दर्पण । एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपादरम्यान एसटीच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तणुक केल्याचा प्रकार घडला होता. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनकरण ही कामगारांची प्रमुख मागणी आहे. तिसऱ्या दिवशी संपाची तीव्रता अधिक वाढल्याने परिवहन विभागाने संपकऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला. यात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निर्देशानुसार राज्यभरात कारवाईचे सत्र सुरु आहे. राज्यातील साडेतीनशे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अमळनेर आगारात संपादरम्यान संपात सहभागी व्हा; असा आग्रह धरीत गळ्यात हार टाकत महिला आगार प्रमुखाशी गैरवर्तवणुक केल्याचा प्रकार सोमवारी घडला. या तक्रारीनुसार विभाग नियंत्रकांनी अमळनेर आगारातील योगेश छगन घोडके, शीतल माणिक पाटील, प्रवीण साहेबराव मिस्तरी व किरण पाटील या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.