नंदुरबार राजमुद्रा दर्पण । नंदुरबार जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली होती. परंतु, या कर्मचाऱ्यांना मुंबईला पोहचण्यापुर्वी पोलिसांनी अडविले. एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. यात नंदुरबार आगारातून उशिरा रात्री मुंबई येथे मोर्चासाठी निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची बस पोलिसांनी अडवून शहर पोलिस ठाण्यात जप्त केली आहे.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या बसच्या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाला विचारले असता सदर बसचे कागदपत्र नसल्यामुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.