मुंबई राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गँगस्टर रियाझ भाटीसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे रियाझ भाटी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशीही रियाझचे सबंध असल्याचं समोर आलं आहे.
रियाझचा दाऊदच्या टोळीशी संबंध आहे. त्याच्यावर फसवणूक, खंडणी वसुली, जमीन बळकावणे आणि फायरिंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 2015 ते 2020मध्ये बनावट पासपोर्ट बाळगल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यावेळी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत देश सोडून पळून जाताना त्याला अटक करण्यात आली होती.
फेब्रुवारी 2020मध्ये जमानतीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले होते. तो सौदी अरबमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यापूर्वी 2015मध्ये त्याला एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो साऊथ आफ्रिकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. तेव्हा त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला 2013मध्ये अटक केली होती. तो फेक पासपोर्ट घेऊन पळून जात होता.