मुंबई राजमुद्रा दर्पण। क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून पत्रकार परिषदेत फडणवीसांनी निलोफर यांचे पती समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा दावा केला आहे. मात्र फडणवीसांनी केलेले आरोप पुर्णपणे चुकीचे असल्याचे निलोफरने सांगितले आहे. त्यावरून आता निलोफरचे पती समीर खान यांनी फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा केला आहे आणि तशी नोटीस देखील त्यांनी फडणवीसांना पाठवली आहे.
बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी “डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडते” असे ट्विट केले होते. त्यावर निलोफर मलिक यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, “आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा” असे उत्तर दिले होते.