नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) आपल्या ग्राहकांना मोफत दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी संबंधित ग्राहकाचे प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते असायला हवे. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला एसबीआयमध्ये प्रधानमंत्री जनधन योजेनेंतर्गत खाते उघडावे लागणार आहे. ज्या व्यक्तींना एसबीआयचे रुपे जनधन डेबीटकार्ड मिळाले आहे, असे सर्वजन या योजनेसाठी पात्र असणार आहेत. ज्या व्यक्तींनी 28 ऑगस्ट 2018 पूर्वी बँकेत खाते उघडले आहे, त्यांना देखील या विम्याचा लाभ मिळणार आहे. ज्या व्यक्तीचे एसबीआयमध्ये जनधन खाते आहे त्या व्यक्तींन 2 लाखांचा तर ज्यांनी 28 ऑगस्ट 2018 पूर्वी बँकेत खाते उघडले आहे, त्यांना एक लाखांचा अपघाती विमा मिळणार आहे.
संबंधित व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ घेण्यासाठी बेनिफिशरी म्हणून ज्या व्यक्तीचे नाव असेल, त्या व्यक्तीला एसबीआयचा एक क्लेम फॉर्म भरावा लागणार आहे. त्या फॉर्मसोबत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, अपघाती मृत्यू झाल्याची एफआयआरची कॉपी आणि मृत व्यक्तीचे आधारकार्ड जोडावे लागणार आहे. सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर बेनिफिशरी व्यक्तीला विम्याची रक्कम मिळेल. मात्र अपघाती मृत्यू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत ही सर्व प्रक्रिया करणे आवश्यक आहे.