दिल्ली राजमुद्रा दर्पण – तुम्ही तुमचे तिकीट घरी विसरला असाल, कींवा हरवले असेल तर तुम्ही अशावेळेला तातडीने टीसीशी संपर्क साधा. त्याला सर्व माहिती द्या. तुम्ही ऑनलाईन तिकीट काढताना जी माहिती भरली होती, त्यातील काही माहिती देऊन तुम्ही परत तिकीट मिळू शकता. अथवा तशी सुविधा नसेल तर फक्त 50 रुपयांचा दंड भरून तुम्ही टीसीकडून दुसरे तिकीट घेऊ शकता.
हे सर्व काम तुम्हाला रेल्वेचा प्रवासी चार्ट तयार होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. चार्ट बनल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या कन्फर्म तिकीटाची डुप्लीकेट कॉपी हवी असेल तर तिकिटाच्या निम्मी किंमत तुमच्याकडून वसूल केली जाई. मात्र चार्ट तयार होण्यापूर्वी तुम्ही टीसीशी संपर्क साधल्यास तुम्हाला केवळ 50 रुपयांमध्ये डुप्लीकेट तिकीट मिळू शकते. रेल्वेच्या इतर क्लाससाठी ही रक्कम 100 एवढी असते. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल किंवा तुमच्या तिकिटाचे स्टेटस हे आरसी असेल तर तुम्हाला डुप्लीकेट तिकीट मिळणार नाही. जर तुमचे ओरिजिनल तिकीट प्रवासादरम्यान तुम्हाला पुन्हा सापडले, तर तुम्ही प्रवास संपण्याच्या आधी ओरिजिनल आणि डुप्लीकेट असे दोन्ही तिकीटे टीसीला दाखवून दंडाची रक्कम परत मिळू शकता. त्यामुळे आता तिकिट हरवल्यास चिंता करण्याचे कारण नाही.
दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. काही लोक एकटे प्रवास करतात, तर काही आपल्या परिवारासोबत. अनेकवेळा घाई गडबडीध्ये आपण आपले तिकीट घरी विसरतो किंवा ते आपल्याकडून हरवते. अशा वेळेस आपल्यावर विनातिकीट प्रवास करण्याची पाळी येते. विनातिकीट प्रवास करताना आपण पकडले तर जाणार नाहीना? अशी भिती सतत आपल्या मनामध्ये असते. विनातिकीट पकडल्यास दंड देखील वसूल केला जातो. मात्र आता जर तुम्ही तुमचे तिकिट घरी विसरले असाल तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही…