मुंबई राजमुद्रा दर्पण। विकी कौशल आणि कतरिना कैफचे नाते विकीची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीला त्यांच्या लग्नाच्या चर्चांमुळे फरक पडत नाही, असे हरलीन सेठी मित्रांना म्हणाली हरलीन सेठी आणि विकी कौशल एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण आज सर्व काही बदलले असून दोघांचेही मार्ग देखील वेगळे झाले आहेत. विकी लवकरच अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. यावर आता हरलीन आणि विकीच्या एका कॉमन फ्रेंडने यावर हरलीनची काय प्रतिक्रिया आहे, याबाबत सांगितले आहे. विकी कौशल आणि हरलीन सेठी रिलेशनशिपमध्ये असताना विकीने क्षणोक्षणी रंग बदलले आहेत. त्यामुळेच त्यांचा ब्रेकअप झाला, असा खुलासा या मित्राने केला आहे.
हे सर्व ‘संजू’ आणि ‘उरी’ चित्रपटांच्या यशानंतर घडले. पण हा आता भूतकाळ आहे. यामुळे आता हरलीनला काहीही फरक पडत नाही. विकी कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याने हरलीन अजिबात नाराज नाही, असे या मित्राने सांगितले आहे. याबाबत हरलीन सेठीने मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सूत्रानुसार हरलीनचे काही मित्र जेव्हा तिला कतरिना आणि विकीच्या प्रेमप्रकरणाबद्दल तसेच लग्नाबद्दल विचारतात, तेव्हा ती त्यांना थांबवते आणि ‘मला त्या झोनमध्ये पुन्हा नेऊ नका’ असे म्हणते.