पुणे राजमुद्रा दर्पण । ऐन दिवाळीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. यामुळे आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत, राज्यभरातील 9 नोव्हेंबर राजी ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले तर, 10 नोव्हेंबरला पुन्हा 63 आगारातील 542 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
10 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईमध्ये एकुण 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने आता निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 918 वर पोचली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पाठीमागे घ्यावे आणि कामावर रूजू व्हावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांंनी 10 नोव्हेंबरला दुपारी केले होते. मात्र, एसटी कामगार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने महामंडळाकडून सलग दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
या निलंबनाच्या कारवाईमध्ये नागपूर विभागातील कटोल, रामटेक, इमामवाडा, गणेशपेठ, घाटरोड आगारातील 46 कर्मचारी, वर्धा विभागातील तळेगाव आगारातील 10 कर्मचारी, भंडारा विभागातील पवणी, साकोला, भंडारा आभारातील 30, चंद्रपुर विभागातील चिमुर वरोरा आगारातील 15, अकोला विभागातील रिसोड, मंगरूळरपीर आगारातील 20, बुलढाणा विभागातील चिखली, मेहकर, खामगाव आगारातील 34, यवतमाळ विभागातील नेर, वणी, उमरखेड, पुसद आगारातील 46, अमरावती विभागातील परतवाडा, चांदुररेल्वे, बडनेरा आगारातील 20, औरंगाबाद विभागातील 10, बीड विभागातील बीड, पाटोदा, गेवराई, धारूर आगारातील 22, उस्मानाबाद विभागातील भुम, तुळजापुर, कळंब, परांडा, उस्मानाबाद, उमरगा आगारातील 36, परभणी विभागातील वसमत, कळमनुरी, परभणी, गंगाखेंड जिंतुर आगारातील 25, नाशिक विभागातील नांदगाव, पेठ, मालेगाव, कळवण आगारातील 40, अहमदनगर विभागातील जामखेड, श्रीगोंदा, नेवासा आगारीतील 20, जळगाव विभागातील एरंडोल, यावल, जळगाव आगारातील 28, पुणे विभागातील राजगुरूनगर, इंदापुर, नाराय़णगाव, विकाशा, बारामती आगारातील 26, सांगली विभागातील इस्लामपुर, आटपाटी आगारातील 58, सातारा विभागातील फलटण आगारातील 2, सोलापुर विभागातील मंगळवेढा, अक्कलकोट, सोलापुर आगारातील 35 तर, रायगड विभागातील कर्जत, श्रीवर्धन, अलिबाग व मुरूड आगारातील 19 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.