मुंबई राजमुद्रा दर्पण – राणू मंडलला तिच्या गायन कौशल्यामुळे हिमेश रेशमियाने आपल्या सोबत गाण्याची संधी दिली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर गाणं मागून भीक मागणाऱ्या राणूला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र, राणूला आपली लोकप्रियता सांभाळता आली नाही. परिणामी राणूवर पुन्हा रेल्वे स्टेशनवर गाणं गाण्याची वेळ आली. असे असले तरी देखील राणू कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. राणू मंडलच्या नावाने प्रमोशन होत असलेलं हे गाणं यूट्यूबवर तुफान व्हायरल होत आहे. 9 लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं आतापर्यंत पाहिलं आहे.
सध्या राणूचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. छठ पूजेचे हे गाणे व्हायरल होत आहे. सध्या बिहार आणि बंगालच्या काही भागामध्ये छठ पूजेचा सण साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात या सणाचे गाणे मोठ्या प्रमाणात ऐकले जात आहेत. अशातच राणू मंडलचा आवाज असल्याचे सांगून एक गाणं व्हायरल तुफान झालं आहे.