जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे नव्यानेच कार शिकत असलेल्या तरुणाच्या कारचा दुचाकीला कट लागल्याच्या कारणाने दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत जखमी झालेल्याना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असता तेथेही दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण होते दरम्यान मोहाडीचे सरपंच तथा आरोग्यदूत धनंजय सोनवणे यांनी मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता.