(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलीस दल व रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिरात जळगाव जिल्हा पोलिस दलातील १२१ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या बहुमूल्य रक्ताचे दान करून कोरोना काळात रक्ताचा तुटवडा कमी करण्यात मोठा हातभार लावला आहे. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, प्रताप शिकारे, बापू रोहोम, रविंद्र सोनवणे, विलास शेंडे, अनिल बडगुजर, विठ्ठल ससे, अरुण धनवडे, संतोष सोनवणे व पोलीस कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.