मुंबई राजमुद्रा दर्पण । विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मलिक यांनी ड्रग्स प्रकरणात आणि अंडरवर्ल्डशी संबंधित काही गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी सुरु केलेल्या आरोपांच्या मालिकेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांची स्तुती केल्याची माहिती मिळतेय. याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
‘गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भांगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत’, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.