जामनेर राजमुद्रा दर्पण :- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या बाबतीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे वारंवार आरोप करत आहे.नवाब मलिक व पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र देवेंद्र फडणवीस सतत करत आहे म्हणून त्यांच्या निषेधार्थ आज जामनेर येथे नगरपालिका चौकात देवेंद्र फडणीस यांचे पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी जामनेर शहराध्यक्ष पप्पू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील,सामाजिक न्यायचे तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे,दीपक रिछवाल,युवक शहराध्यक्ष विनोद माळी, खालिद साहब,ओबीसी तालुकाध्यक्ष राजू नाईक, इमरान गफ्फार, संतोष झाल्टे, जलील शेख, ऐफाज मुल्लाजी,निखिल निकम, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरस, साबीर शेख मिस्तरी, अझहर शेख, शाहिद शेख, राजू शेख,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.