दिल्ली राजमुद्रा दर्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. रिझर्व्ह बँकेच्या रिटेल डायरेक्ट योजनेमुळे आता सामान्य गुंतवणूकदारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये थेट गुंतवणूक करता येईल. रिटेल डायरेक्ट योजनेचे अकाऊंट विनामूल्य उघडता येईल. रिटेल डायरेक्ट स्कीमच्या पोर्टलवरुन सरकारी सिक्युरिटीज, ट्रेझरी बिल, स्टेट डेव्हलपमेंट लोन आणि सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. ही एक मोठी आर्थिक सुधारणा असल्याची प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.
RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपाल योजनेचा शुभारंभ करतील. यातून वन नेशन वन लोकपाल ही संकल्पना साकार होईल, तीही एक पोर्टल, एक ईमेल आणि एक पत्ता. एका पोर्टलवर ग्राहक तक्रारी नोंदवू शकतील, कागदपत्रे सबमिट करू शकतील, स्टेटस ट्रॅक करू शकतील आणि फीडबॅक देऊ शकतील. एकात्मिक लोकपाल योजना ही RBI द्वारे नियमन केलेल्या संस्थांविरुद्धच्या तक्रारींसाठी एकात्मिक योजना आहे. तक्रारी दाखल करण्यात आणि तक्रार निवारणाबाबत माहिती देण्यासाठी RBI बहुभाषिक टोल-फ्री नंबर देखील जारी करेल.