(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड येथील सराईत आरोपी अजय काळभोर याला आपल्या वाढदिवसाची पोस्ट फेसबुकवर टाकणं चांगलंच महागात पडलं. या सराईत आरोपीचा वाढदिवस असल्याने त्यांने आपली दहशत निर्माण करणारी एक पोस्ट फेसबुकवर टाकून शेअर केले. याचा त्याला चांगलाच दणका बसला. त्याच्या या पोस्टची दखल खुद्द पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेऊन याला वाढदिवसाची लक्षात राहील अशी भेट देऊ केली आहे. फेसबुकवर वाढदिवसाची पोस्ट टाकणाऱ्या सराईत आरोपीला त्याच्या अनिल सोनवणे आणि सोमनाथ देभाडे या दोघी सराईत गुन्हेगार मित्रांसह पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. वाढदिवसाची दहशत निर्माण करणारी फेसबुक पोस्ट या गुन्हेगारांना चांगलीच महागात पडल्याचे दिसून येत आहे.