मुंबई राजमुद्रा दर्पण। भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात म्हणाली होती. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. भाजपा नेते वरुण गांधी यांनी देखील कंगनावर टीका केली.
यावरू मोठा वाद निर्माण झाला आहे. आता या वादात संजय राऊत यांनी देखील उडी घेतली असून, कंगनाच्या वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपाने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे राऊत यांनी म्हटले. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.