औरंगाबाद राजमुद्रा दर्पण। गुरुवारी 09 नोव्हेंबर रोजी घटलेल्या अन्य एका घटनेत उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून माय-लेकाने भाजीपाला विक्रेत्या पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली. चारित्र्यावर संशय घेऊन रॉकेल टाकून तिला जाळून मारल्याप्रकरणी प्रभाकर गंगाधर लोखंडे यास वैजापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रभाकर लोखंडे याने पत्नी संगीता हिला पैशांच्या कारणावरून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन 17 मे 2017 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरातील किचनमध्ये मारहाण केली होती. तसेच खाली पाडून तिच्या अंगावर रॉकेल टाकून आगकाडी लावून दिली होती. हा सगळा घटनाक्रम पत्नी संगीता हिने मृत्यूपुर्वी नोंदवलेल्या जबाबात सांगितला होता.
या प्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत, पोलीस अंमलदार फकीरचंद फडे यांनी आरोपीविरुद्ध दोषपत्र दाखल केले होते. सदर खटला वैजापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांच्या कोर्टात चालला होता. या खटल्यात शासनाच्या वतीने सरकारी वकील एन.एस. जगताप यांनी काम पाहिले. त्यांना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संघराज दाभाडे यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून मदत केली. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी प्रभाकर लोखंडे यास आजीवन कारावास व 10 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिले साधी कैद तसेच पत्नीचा छळ केल्याप्करणी 3 वर्षे कारावासाची शिक्षा व 2 हजारांचा दंड, दंड न भरल्यास 1 मिहना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.