जळगाव राजमुद्रा दर्पण। कालिंका माता मंदिर ते तरसोद फाट्यापर्यंत रस्ता खराब असल्यामुळे दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी रस्ता रोको आंदोलन साठी पंकज बोरोले यांनी विठ्ठल ससे ,पोलीस उप अधीक्षक (गृह)पोलीस मुख्यालय जळगांव यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आज 12 नोव्हेंबर 2021 रोजी संबंधित ठेकेदार यांनी कामाला सुरुवात केले असून आता नागरिकांना होणार त्रास कमी होईल.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांच्या मागणीला यश आल्यामुळे नागरिकांनी आभार व्यक्त केले व पंकज बोरोले यांनी ठेकेदार यांचा सत्कार केला. चांगले व उत्कृष्ट दर्जाचे काम व्हावे अशी विनंती ठेकेदाराला करण्यात आली.