जळगाव राजमुद्रा दर्पण। जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत माघारीच्या दिवशीच भाजपला मैदानातून काढता पाय घ्यावा लागण्यासारखे डावपेच महाविकास आघाडीने यशस्वी करून दाखवले असे बोलले जात असले तरी पुन्हा जिल्ह्यात महाविकास आघाडीशी संघर्षाचे संकेत आमदार गिरीश महाजन यांनी दिले आहेत .
जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्कार टाकून भाजप आपल्या सर्व उमेदवारांचा अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर करताना पहिल्यांदा आमदार गिरीश महाजन यांनी या संघर्षाच्या संकेतांचे सूतोवाच केले होते जिल्हा बँकेत नियमबाह्य कर्जवाटपाचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला होते आताच्या निवडणुकीत महाविकास आघडी जिल्हा बँकेत सत्तेवर आली तरी त्यांना आम्ही सुखाने नांदू देणार नाही त्यांनी केलेले गैरवयवहार म्हणजे त्यांच्या चुका त्यांच्या पदरात टाकू , या गैरव्यवहारांची चौकशी लागल्यावर कायदेशीर निर्णय तपास यंत्रणा घेतीलच , असे ते म्हणाले होते .
आता काल याच भूमिकेचा पुनरुच्चार आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे . जळगावात काळ चोपडा तालुक्यातील सरपंच , माजी सरपंच आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी केलेल्या भाषणातही आमदार गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीशी राजकीय संघर्ष आता अटळ असल्याचे सांगितले . त्यांना कळेल की त्यांनी दगाबाजी करून काय चुका केल्या ते …. आता आमचा जिल्हा बँकेशी संबंध तुटला आहे या बँकेची निवडणूक आता आमच्यासाठी महत्वाची नाही …. पाठीत त्यांनी खंजीर खुपसला पुढे बघा काय होत ते …. फार वेळ विरोधी पक्षात नाही राहायचे आहे …. ही आमदार गिरीश महाजन यांची विधाने या राजकीय संघर्षाची पायाभरणी करीत असल्याचे बोलले जात आहे .